सामाजिक सुरक्षाः अमेरिकन अनुभव (भाग १)
‘औद्योगिक क्रांती’ ही प्रक्रिया युरोपात सुरू झाली. अनेक वर्षे मुरत असलेले, पिकत असलेले घटक एकत्र होऊ लागले, आणि पारंपरिक शेती-बलुतेदारी जीवनशैलीने जगणाऱ्यांचे समाजातील प्रमाण कमी होऊ लागले. मुख्य फरक होता ऊर्जेच्या स्रोतांत. तोवर शेती व तिच्याशी संबंधित उद्योगांमध्ये मुख्यतः माणसे आणि जनावरे यांच्या स्नायूंची ऊर्जा वापरली जात असे. नव्या जीवनशैलीत इंधनाची ऊर्जा वापरून यंत्रे काम …